घोट : चामोर्शी तालुक्यातील घोट गटग्रामपंचायत अंतर्गत कुर्दुळ येथे एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ३ नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. ऋती अनिल पचारे (१७, रा. कर्दळ (घोट) असे मयत मुलीचे नाव आहे. तिचे वडील अनिल पचारे यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार ऋती व घरातील सर्व जण ३ नोव्हेंबर रोजी रात्री जेवण करून ओठ्यावर बसले होते.
त्यावेळेस ऋती ही मोबाइलवर काहीतरी पाहते म्हणून घरात गेली. काही वेळाने लहान बहीण अनुष्का ही घरात गेली असता तिला ऋती ही घराच्या आळ्याला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. तिने कुटुंबीयाला माहिती दिली. तिला फासावरून उतरविले, पण त्याआधीच मृत्यू झाला होता. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. तपास सहायक निरीक्षक नीलेश गोहणे करीत आहेत.
हरणघाट (पारडी) पिठाचे मठाधिवती संत श्री मुरलीधर महाराज यांचा आज ९ ऑगस्ट रोजी प्रगट दिनाचे औचित्य साधून बांगलादेशात हिंदू समाजावर जे अन्याय अत्याचार चालू आहे,त्याविषयी दुःख व्यक्त करीत हिंदू धर्माची संपूर्ण महती बाबत ने आपल्या भाविक भक्तांसमोर व्यक्त केली.
धर्म कोणताही असो परंतु कोणत्याही धर्मावर अन्याय होऊ नये आणि आपण सर्व एकच आईचे लेकर आहोत,सर्वांनी गुण्यागोविंदाने एकमेकांत मिळून मिसळून वागावे हाच खरा मानवधर्म आहे,असेही मत बाबांनी व्यक्त केले.
संत मुरलीधर महाराज यांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात हरणघाट पारडी मठात बाबांचे भाविक भक्त बाबाला आशीर्वाद देण्याकरिता एकत्र जमले होते.नागपंचमीचा सण असून सुद्धा बऱ्याच प्रमाणात महिला वर्ग देखील सामील झाला होता.
आपल्या घरी जन्मदिवस साजरा करताना मेणबत्तीचा वापर करून त्याला फुंकर मारून विंजविण्यापेक्षा,आपल्याच घरातील मातीच्या दिवलनीचा दिवा लावून प्रगट दिन साजरा करा आणि प्रत्येकाच्या वाढदिवसाला घरासमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी एक झाड लावा जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि वातावरण देखील शुद्ध राहील,असा मोलाचा सल्ला संत मुरलीधर महाराज यांनी आपल्या प्रगट दिनाच्या दिवशी आपल्या भाविक भक्तांना दिला.भाविक भक्तांनी टाळ्यांच्या गजरात बाबांचा संदेश आत्मसात केला आणि सुग्रास भोजन करून भाविक भक्त बाबांनी दिलेला मोलाचा संदेश यांची शिधोरी बांधून आप आपल्या गावाकडे रवाना झाले.
गडचिरोली जिल्ह्यातील कृषी पंप धारक शेतकरी 24 तास वीज मिळविण्याकरिता महाराष्ट्र सरकारकडून वारंवार मागणी करून देखील,जिल्ह्यातील कृषीपंप धारकांवर भारनियमनाचा बडगा उभारून शासनाने जिल्ह्यातील कृषीपंप धारकांवर सतत अन्याय केलेला आहे.
जिल्ह्यातील कृषीपंप धारक कित्येकदा रस्त्यावर उतरून सरकार विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.वारंवार निवेदने सुद्धा दिल्या गेली.इतकेच नव्हे तर राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून निवेदन सुद्धा देण्यात आले.ऊर्जामंत्र्यांनी कृषी पंप धारकांच्या शिष्टमंडळासोबत 12 तास विज उपलब्ध करून दिल्या जाईल, असा पोकळ आश्वासन देखील दिला आणि त्या आश्वासनाची पूर्तता केल्या गेलीच नाही.म्हणजे ऊर्जामंत्री त्यावेळी अक्षरशः खोटे बोललेत.
राज्यातील राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची घोरनिराशा केली.अन हाताशी आलेला पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत निस्तनाबूत झाला.राज्यातील सत्याधारी पक्ष कृषी पंप धारका सोबत सावत्र पणाची वागणूक दिल्ली,परंतु राज्यातील विरोधी पक्षाने सुद्धा कृषी पंप धारकांची बाजू समजून घेण्यात कमजोर पडले.म्हणजे त्यांनी सुद्धा कृषी पंप धारकांचे अश्रू पूसू शकले नाहीत.
संकटाच्या काळात आम्हाला राज्यकारण्यांनी वाऱ्यावर सोडले तर अशा लोकांना निवडून देण्यात काहीच अर्थ नाही,असं जिल्ह्यातील अन्यायग्रस्त कृषी पंप धारकांचा म्हणणं आहे.म्हणून राज्यातील सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचे उमेदवार असोत,जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी भारनियमन लागू आहे त्या त्या भागातील कृषी पंप धारक येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकरिता मतदानावर बहिष्कार करण्याच्या तयारीत आहेत.तशा प्रकारचे निवेदन सुद्धा निवडणूक अधिकारी व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येणार आहे.
भेंडाळा सब स्टेशन अंतर्गत येणारे कळमगाव व घारगाव असे मिळून दोन पीडर अस्तित्वात झाले आणि जिल्हाभरातून नेमके हेच दोन फीडर आहेत की तिथे भारनियमन सुरू आहे. कृषीपंप धारकांनी मागे कित्येक निवेदने दिलेत ,नंतर महावितरण कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांच्या नेतृत्वात जन आंदोलन उभे केल्या गेले.
त्यावर काही दिवसांसाठी ८ तासाचे भारनियमन १२ तासांवर सुरू झाले आणि १२ तास वीज होत आहे म्हणून शेतकऱ्यांनी दुबार पिकाची लागवड केली.नेमकं तिथंच सरकारने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेलं आणि बारा तासाची वीज आठ तासांवर आणून सरकारने शेतकऱ्यांना मोठं पारितोषिक दिलं.
एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करू,अशी पोकळ आश्वासने देतो आहे आणि दुसरीकडे भारनीयमनाचा बडगा उगारून शेतकऱ्यांच्या केसाने गळा कापतो आहे.असे राज्यातील सरकार शेतकऱ्यांसोबत सावत्र वागणूक करतो आहे,म्हणून अशा फसव्या सरकारला जाब विचारण्यासाठी कृषी पंप धारक शेतकरी आज रस्त्यावर उतरून सरकारचा जाहीर निषेध करतो आहे.
साधूबाबा कुटी ते तहसील कार्यालय जवळपास दोन किलोमीटरचा अंतर कापत सरकार विरोधात घोषणा देत शेतकरी रस्त्यावरची लढाई लढतो आहे, म्हणजे यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणतं अशी वेळ कृषी पंप धारकांवर आलेली आहे.शासन आपल्या दारी असा नारा देत सरकार जर शेतकऱ्यांची घोर निराशा करीत असेल तर अशा सरकारला मुळासकट उपडून फेकल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही,असं भावना शेतकरी व्यक्त करत आहे.
भारनियमन लागू करायचं असेल तर संपूर्ण जिल्हाभर आधी लागू करा आणि जोपर्यंत जिल्ह्यावर असे आदेश लागू होत नाही तोपर्यंत भेंडाळा सब स्टेशनची भारणीयमन लागू करू नका, हीच अपेक्षा कळमगाव व घारगाव फिडरच्या शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.
दुपारचे एक वाजता कृषी पंप धारकांच्या मोर्चाला सुरुवात झाली सरकार विरोधी घोषणा देत अतिशय शांतपणे कृषी पंप धारक शेतकरी तहसील कार्यालयावर धडकला व आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार श्री वैध यांचेकडे सुपूर्द करून आपली मागणी शासन स्तरावर योग्य प्रकारे पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यात आली.
तुमच्या मागण्याची दखल योग्य पद्धतीने घेतली जाईल अशा पद्धतीने आश्वासन येऊन मोर्चाची सांगता करण्यात आली जवळपास दोनशेच्या वर कृषी पंप धारकांनी आपली उपस्थिती या मोर्चाला दर्शविली होती.
चामोर्शी तालुक्याच्या मुख्यालयांपासून अवघ्या ८ किमी च्या दुरिवर विदर्भाची काशी म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळख आहे. वैनगंगा नदीच्या तीरावर मार्कंडा देवस्थान,म्हणजे पुरातन मंदिर असून,दरवर्षी माहाशिवरात्रीला मार्कंडेश्वराची मोठी जत्रा भरते,परंतु विदर्भाची काशी अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत असून,त्या कडे कुणीही डोळे उघडून पाहत नाही,अशी अवस्था मार्कंडेश्वराची झालेली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मार्कंडेश्वराचे पुरातत्व मंदिराकडे जातीने लक्ष घातले असते तर कदाचित मार्कंडेश्वर देवस्थानची अशी अवस्था राहिली नसती. परंतु लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित पणामुळे मार्कंडेश्वराची अवस्था दिवसेंदिवस बिकट होतांना दिसते आहे.
माहाशिवरात्री निमित्य मार्कंडा येथे मार्कंडेश्वराची खूप मोठी जत्रा भरते,अन नागपूर,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि बऱ्याच जिल्ह्यामधून भाविक लोक मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी येतात,परंतु स्वताची गैरसोय करून परत जातात आणि पुन्हा पुढच्या वर्षी दर्शनाला येतात,एवढी श्रद्धा भविकाच्या मनात ठासून भरली आहे.
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वराच्या मंदिराचा विकास झाला असता,तर मंदीरा पाठोपाठ मार्कंडा गावाचा देखील विकास होतांना दिसून आला असता. मार्कंडा गावातील किंवा सभोवतालच्या परिसरातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधि उपलब्ध झाल्या असत्या. रोजगारहीन असलेल्या या परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असता आणि त्या बेरोजगार युवकांचा विकासाच्या दिशेने वाटचाल करतांना दिसला असता. म्हणजे एक कदम प्रगती की ओर,हा नारा सभोवतालच्या परिसरातील गावांगावत गुंजताना दिसला असता. युवकांना रोजगाराच्या संधि उपलब्ध करून आत्मनिर्भरते कडे युवकाचा कल दिसला असता. स्वताचा रोजगार निर्माण करून कुटूंबाला हातभार लावण्यात महत्वाचा वाटा राहिला असता.रोजगारहीन युवक रिकाम्या हाताला काम नाही म्हणण्या पेक्षा स्वताच्या पायांवर उभा राहून संसाराची विस्कटलेली घडी मार्गावर आण्यात,सिंहाचा वाटेकरी होतांना दिसला असता.मार्कंडा देवस्थानाला पर्यटनाचा दर्जा मिळाला असता तर युवकाच्या कपाळावर लागलेला बेरोजगारचा कलंक पुसला जाऊन,आत्मनिर्भरते कडे युवकांची वाटचाल होतांना दिसून आली असती.
चामोर्शी तालुक्याच्या मुख्यालयापासून अवघ्या ८ किमी अंतरावर मार्कंडा देवस्थान असून. महत्वाचं वैशिष्ट म्हणजे वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेलं पुरातत्व देवस्थान असून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. मुख्य म्हणजे जे भाविक माहाशिवरात्रीला दर्शनासाठी येतात,त्यांची भरपूर प्रमाणात गैरसोय होत असून,कुठलीही व्यवस्था आजच्या घडीला उपलब्ध नाही,असं खेदानेच म्हणावं लागतो. म्हणून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या देवस्थानाकडे दुर्लक्ष न करता तन-मन-धनाने मन लावून योग्य नियोजन करून व्यवस्था करावी,अशी आशा परिसरातील जनता व्यकत करीत आहे.
लेखक : रमेश चौखुंडे
महाराष्ट्र सरकारने कोनसरी परिसरातील जैरामपूर,मुधोली चक नं.१,मुधोली चक नं.२ ,सोमनपल्ली,गणपूर,विठ्ठलपूर या गावाच्या हद्दीतील एकूण 898.8422 हेक्टर जमीन शासनाने खाजगी व सरकारी क्षेत्र असलेली भूमी अधिग्रहण करण्याचा आदेश काढलेला असून.यामुळे या परिसरातील शेतकरी डबघााईस येणार असून,या विरोधात महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी मौजा जैरामपूर येथे आक्रोश सभा घेण्यात आली होती,एक इंचभर सुद्धा जमीन देणार नाही,असा निर्धार परिसरातील शेतकऱ्यांनी केला.
महाराष्ट्र शासन आपली फसवणूक करीत असून आपल्या कुटुंबाला भूमिहीन करण्याचा सरकारचा विचार आहे आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकार विरुद्ध पेटून उठल्याशिवाय किंवा शेतकरी बांधवांची वज्र मूठ घट्ट केल्याशिवाय कोनसरी,जैरामपूर,मुधोली चक नं.१,मुधोली चक नं.२ ,सोमनपल्ली,गणपूर,विठ्ठलपूर या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना दुसरा पर्याय दिसत नाही.म्हणूनच हा लढा अधिक तीव्र करून एकीची भावना साधने गरजेचे आहे.एकमेकांचे हात धरून चला म्हणजे कुणाची पाय धरायची गरज पडणार नाही,ही एकच आणि कळकळीची विनंती माझ्या शेतकरी बांधवांना करीत आहे.
महाराष्ट्र शासन कोनसरी परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमीन हडपण्याच्या प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकमेकांसोबत मिळून मिसळून एकमेकांचे विचार-आचार समजून घेणे अतिशय महत्त्वाचे असून.आजच्या घडीला यातच शेतकऱ्यांचे सुख सामावले आहे,अन्यथा तलावातील पाणी निघून गेल्यावर पाळ बांधून काहीच अर्थ उरणार नाही,अगदी तशीच गत माझ्या शेतकरी बांधवांची झाल्याशिवाय राहणार नाही,हे मात्र सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे.
कोनसरी परिसरातील शेतकऱ्यांची शेती म्हणजे त्यांच्या काळजाचा तुकडा आहे आणि आपल्या कुटुंबाचा पोट भरण्याचा एकमेव साधन आहे आणि तोच जर का हिरावल्या गेला तर परिसरातील शेतकरी संपल्याशिवाय राहणार नाही,म्हणून शेतकरी बांधवांनी सतर्क राहून,फसव्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहणे काळाची गरज आहे आणि यातच परिसरातील शेतकऱ्यांचे हित सामावले आहे.